google-site-verification: google5deb064fea9fdad3.html mpsc explorer: काय असतात राज्यघटनेतील संघराज्यात्मक आणि एकात्मक वैशिष्ट्ये ?

शनिवार, २७ जून, २०२०

काय असतात राज्यघटनेतील संघराज्यात्मक आणि एकात्मक वैशिष्ट्ये ?

नमस्कार मित्रांनो ,
   आज आपण भारतीय राज्यघटनेतील संघराज्यत्मक आणि एकात्मक वैशिष्ट्ये म्हणजे काय  ? ती कशी ओळखावी ? याचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत , मित्रांनो कालच मी फेसबुक ग्रुपवर यासंबंधी प्रश्न विचारला होता तुम्हाला आश्चर्य वाटेल एकही मित्राने याचे करेक्ट उत्तर दिले नाही म्हणून मला या विषयावर थोडस लिहावं वाटलं , ही कन्सेप्ट पुस्तकी भाषेऐवजी आपल्या भाषेतून जाणून घेतल्याने तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहील .

शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,

हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही

हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

-दुष्यंत कुमार

1. संघराज्य म्हणजे काय ?

     भारतीय घटनेत ' संघराज्य ' या शब्दाचा कुठेच उल्लेख नाही त्या ऐवजी 'राज्याचा संघ' असा उल्लेख केला आहे . याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देताना सांगितले आहे की  " अमेरिकेत जे संघराज्य आहे ते कराराद्वारे निर्माण केलेले आहे तसे करार भारतीय संघराज्य निर्मितीवेळी केलेले नाही म्हणजे भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटकराज्य  हे  नैसर्गिकरित्या भारताच्या मालकीची असतील आणि ही घटक राज्ये विभाजित होऊ शकतील पण विभाजित होऊन भारताबाहेर पडू शकत नाही , त्यांना तसा अधिकार नाही .

             एकंदरीत संघराज्य म्हणजे उत्तर प्रदेश , पंजाब ,हरियाणा , महाराष्ट्र यासारखी 28 घटक राज्ये आणि जम्मू कश्मीर , अंदमान निकोबार सारखे 8 केंद्रशासित प्रदेश यांचे मिळून भारत हा एक संघराज्य असेल .
    आपल्याला माहीत आहे जून 2014 मध्ये आंध्रप्रदेश मधून तेलंगणा राज्य वेगळे झाले , नुकतेच जम्मू काश्मीर राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती केली मात्र ते भारतातून वेगळे झाले नाही राज्यांचे  विभाजन जरी झाले तरी ते भारताचा भाग म्हणूनच राहतील म्हणजे भारत ' एक भंजक राज्याचा अभंजक संघ आहे '

2. संघराज्यत्मक वैशिष्ट्ये म्हणजे काय ?
     संघराज्य म्हणजे काय हे आता तुम्हाला समजले मग संघराज्यात्मक वैशिष्ट्येही आपोआप समजतील  आता आपल्याला माहीत आहे  की भारतीय संघराज्यात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या सर्वांना घटनाकर्त्यांनी काही अधिकार विभागून दिले आहे ते अधिकार म्हणजेच संघराज्यात्मक अधिकार ते आपण सविस्तर पाहू
पण ते समजून घेताना एक गोष्ट लक्षात असू द्या की संघराज्यत्मक पद्धती मध्ये केंद्र आणि राज्य अशीच विभागणी असेल

A. दुहेरी शासन पद्धती
       केंद्र पातळीवर केंद्रसरकार चे शासन असते तर राज्यपातळीवर राज्य सरकारचे

B. लिखित राज्य घटना
     आपल्या राज्य घटनेत स्पष्टपणे केंद्रासाठी वेगळ्या तरतुदी तर राज्यांसाठी वेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत
         याऐवजी ' एकच राज्यघटना ' असा शब्द आला तर ते एकात्मिक वैशिष्ट्य असेल याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत

C. घटनेची ताठरता
घटनेत 368 नुसार दुरुस्ती करताना काही संघराज्यीय तरतुदीत बदल करताना विशेष बहुमतासोबत निम्म्या राज्यांची सहमती आवश्यक असते म्हणजे येथेही केंद्र आणि राज्याचा संबंध आला म्हणून हे ही संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे

D. स्वतंत्र न्यायव्यवस्था
सर्वोच्च न्यायालय हे संपूर्ण देशशासाठी म्हणजे केंद्रपातळीवर कार्य करते तर उच्च न्यायालय हे राज्य पातळीवर कार्य करते येथेही केंद्र राज्यात अधिकार विभागणी म्हणून संघराज्यत्मक वैशिष्ट्य
           मात्र 'एकात्मिक न्यायव्यवस्था ' असा शब्द विचारात घेतला तर हे एकात्मक वैशिष्ट्य असेल

E. सातवी अनुसूची
यात संघ ,राज्य ,आणि समवर्ती सुचिद्वारे स्पष्ट तरतुदी आहे म्हणून हेही संघराज्यात्मक

F. द्विगृही संसद
लोकसभा लोकांचे प्रतिनिधित्व करते तर राज्यसभा राज्यांचे येथेही केंद्र आणि राज्याचा संबंध येतो म्हणून संघराज्यत्मक वैशिष्ट्य होईल

G.घटनेची सर्वोच्चता
केंद्र -राज्याच्या तरतुदींपेक्षा घटनेतील तरतुदी सर्वोच्च असतील

3.एकात्मक वैशिष्ट्ये म्हणजे काय ?
ज्या वैशिष्ट्यातून केंद्राचे अधिकार हे राज्यांपेक्षा जास्त दिसून येतात व ते एकमेव असतात त्यांना एकात्मक वैशिष्ट्ये म्हणतात

A. प्रभावी केंद्र
केंद्रामध्ये व राज्यांमध्ये कायदेविषयक वाद झाला असता केंद्राचे कायदे प्रभावी ठरतात

B. एकच राज्यघटना
संपूर्ण देशासाठी एकच राज्यघटना असेल कोणत्याही राज्याची वेगळी घटना नसेल

C. घटनेची लवचिकता
घटना दुरुस्ती करताना बऱ्याचश्या तरतुदी साध्या बहुमताने दुरुस्ती केल्या जातात त्यावेळी राज्यांचा कोणताही विचार केला जात नाही

D.एकात्मिक  न्यायव्यवस्था
संपूर्ण देशासाठी न्यायप्रणाली एकच राहील एकच संहिता राहील वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळे कायदे करून न्याय देता येणार नाही

E. अखिल भारतीय सेवा
संपुर्ण देशपातळीवर एकच संस्था विविध सेवा अधिकाऱ्यांची पदभरती करून त्यांच्या प्रशासनाची सोय करेल

F. राज्यपालांची राष्ट्रपती मार्फत नेमणूक
राज्यपाल निवडून न देता त्याची राष्ट्रपती मार्फत नेमणूक केली जाईल ज्यामुळे कोणत्याही राज्याचा राजपाल राष्ट्रपतींच्या समतुल्य असणार नाही

G. आणीबाणी विषयक तरतुदी
आणीबाणी दरम्यान केंद्राचे कायदे अधिक प्रबळ असतील

याच प्रमाणे
H. एकात्मिक लेखापरीक्षण
I. भंजक घटक राज्ये
J. राज्यसभेत राज्यांच्या प्रतिनिधी ची असमानता
K. राज्यसुचितील कायद्यावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार

  या सर्व बाबी केंद्राला अधिक सामर्थ्यवान करतात आणि राज्य त्यामानाने दुबळे असतात म्हणून ही सर्व एकात्मिक वैशिष्टे आहे
            मित्रानो यांसारखे विविध मुद्द्यांवर सखोल विश्लेषण आपण या ब्लॉगवर करणार आहोत त्यासाठी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय असतात राज्यघटनेतील संघराज्यात्मक आणि एकात्मक वैशिष्ट्ये ?

नमस्कार मित्रांनो ,    आज आपण भारतीय राज्यघटनेतील संघराज्यत्मक आणि एकात्मक वैशिष्ट्ये म्हणजे काय  ? ती कशी ओळखावी ? याचा तुलनात्मक अभ्यास क...